Ad will apear here
Next
विशेष मुलांनी घडविले गणेशरूपांचे ‘आविष्कार’
रत्नागिरीतील आविष्कार संस्थेत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा
रत्नागिरी : रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील विशेष मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने विविध प्रकारच्या साहित्यातून गणेशरूपे साकारली आणि पर्यावरणपूरक व कलात्मक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या हातून घडलेल्या आविष्कारांचे प्रदर्शन पाहणारे थक्क होत होते. (प्रदर्शनाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

संस्थेतील सविता कामत विद्यामंदिर आणि श्यामराव भिडे कार्यशाळेचे विद्यार्थी गटानुसार, तसेच विभागानुसार श्री गणेशाची पर्यावरणपूरक चित्रे व प्रतिमा बनवत असतात. त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू असून, यंदाही तो मोठ्या उत्साहात पार पडला. १० आणि ११ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. 

गेली अनेक वर्षे ७० टक्के कागदी लगदा आणि ३० टक्के शाडूची माती अशा मिश्रणातून कार्यशाळेचे विद्यार्थी सुंदर अशी ‘आविष्कारच्या राजा’ची मूर्ती साकारतात. त्याचप्रमाणे याही वर्षी साकारली होती. या मूर्तीची १० सप्टेंबरला ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य द्वारापासून मिरवणूक काढून ज्ञानेश्वर वंडकर प्रार्थनागृहामध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 

सोमवारी (१० सप्टेंबर) प्रतिष्ठापनेनंतर पूजा, आरती, नैवेद्य झाल्यावर श्यामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी भजन केले. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक उदय गोखले यांनी सोमवारी दुपारी बाप्पासमोर सगळ्या मुलांच्या आवडीची गाणी व्हायोलिनवर सादर केली. ११ सप्टेंबरला सकाळी आरती झाली, नंतर ‘जीजीपीएस’ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे भजन झाले. त्यानंतर ‘आविष्कार’च्या सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे भजन, आरती आणि विसर्जन मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली.

चित्रांचे प्रदर्शन
‘आविष्कार’च्या मुलांनी साकारलेल्या श्री गणेशाच्या विविध रूपांचे प्रदर्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले होते. त्याला रत्नागिरीकरांनी भेट दिली. या दोन दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे सण समारंभातून मिळून मिसळून राहण्यासाठीचे शिक्षण मिळते. तसेच गणेशमूर्ती बनवण्यापासून ते विसर्जनापर्यंत गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा प्रत्यक्ष कृतीद्वारे अनुभव मिळतो, असे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर आणि मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी सांगितले. 

(‘आविष्कार’ संस्थेबद्दल सविस्तर माहिती देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘आविष्कार’च्या मुलांनी साकारलेल्या गणेशरूपांचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. ) 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZSNBS
Similar Posts
‘आविष्कार’च्या वस्तू एक नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आविष्कार संस्थेच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील आदी वस्तूंची स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी येथे, तर एक ते चार नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत रत्नागिरी शहरातील स्वा
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
भिडे कार्यशाळेत ‘पाणी वाचवा’ संदेश देत रंगोत्सव साजरा रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेमध्ये दर वर्षी शिमगोत्सव आणि रंगोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षीही ‘पाणी वाचवा’ असा संदेश देत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘क्षण रंगलेले’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language